‘गद्दार मुख्यमंत्री खुर्चीवर बसला अन् महाराष्ट्रावर मोठं संकट आलं’; भाजपा आमदाराची टीका

४० वर्षेात सातारा जिल्ह्याला त्यांनी काय दिलं?
मुंबई : गद्दार मुख्यमंत्री खुर्चीवर बसला अन् महाराष्ट्रावर मोठं संकट आलं, अशी घणाघाती टीका भाजपा आमदार जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. ते महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या सातारा जिल्हा भाजप कार्यकारिणीची बैठक आणि दोन दिवसीय अभ्यसवर्ग शिबिराचे समारोप प्रसंगी बोलत होते.
ज्या योजनेतून अनेकांचे जीव वाचले, अनेकांच्या संसाराला हातभार लागला, ती मुख्यमंत्री साहायत्ता निधी योजना बंद करणारा पहिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या रूपाने महाराष्ट्राने पाहिला. गद्दार बारामतीकरांच्या नादाला लागून शेताचा बांध न पाहिलेला आणि शेतकऱ्यांना त्रास होणारा मुख्यमंत्री खुर्चीवर बसला आणि महाराष्ट्रावर मोठं संकट आलं, असं जयकुमार गोरे म्हणाले.
आपण यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार समजायचे, त्यांच्याच सातारा जिल्ह्यात आपला पक्ष त्यांनी वाढवला, पण ४० वर्षे एकहाती पाठीशी राहिलेल्या या सातारा जिल्ह्याला त्यांनी काय दिलं? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. सारी विकास केंद्रे बारामतीला नेली, कर्मवीर, यशवंतराव या संस्थांबरोबर त्यांनी औंधचे संस्थानही ताब्यात घेतले. आता त्यांची मक्तेदारी मोडून काढण्याची वेळ आली आहे, असे आमदार जयकुमार गोरे म्हणाले.
बारामतीकरांच्या नादाला लागून शेताचा बांध न पाहिलेला आणि शेतकऱ्यांना त्रास होणारा गद्दार मुख्यमंत्री खुर्चीवर बसला आणि महाराष्ट्रावर मोठं संकट आलं. आम्हाला वेदना झाल्या, पण आचा विचार करण्याची वेळ आली आहे. आगामी काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार, यासाठी काम सुरू आहे. आपणही आता कामाला लागू, असंही आमदार गोरे म्हणाले.





