“सद्य परिस्थितीत भाजप शिवाय…” ; कोठारेंच्या विधानानंतर आता शरद पोंक्षेंचं मोठं विधान

Sharad Ponkshe : “भाजपा म्हणजे आपलं घर आहे, कारण मी स्वतः भाजपाचा भक्त आहे, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भक्त आहे. मुंबईत नक्कीच कमळ फुलेल” असे विधान मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकर दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारेंनी केले होते. एका दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात त्यांनी केलेल्या या विधानाची बरीच चर्चा झाली. अजूनही सुरूच आहे.
या विधानावर कोठारे ठाम असून, त्यांनी प्रतिक्रिया दिली, तर उबाठाचे नेते खासदार संजय राऊत यांनी महेश कोठारे यांनी केलेल्या विधानावर टीकास्त्र डागले. “असे जर बोलाल तर तात्या विंचू रात्री येवून चावा घेईल, तुमचा गळा दाबेल,” असे विधान केले होते.
अशातच आता एका मराठी अभिनेत्रीने महेश कोठारेंच्या विधानाला पाठिंबा दर्शवत सोशल मीडियावर पोस्ट केली होती. या पोस्टवर नेटकऱ्यांनी खूप साऱ्या कमेंट्स केल्या आहेत. मात्र, एक कमेंटने लक्ष वेधून घेतली आहे. ही कमेंट आहे, मराठीतील प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांची. त्यांनी कमेंट करत अभिनेत्रीने पोस्टमधून व्यक्त केलेल्या मताला सहमती दर्शवणारे विधान केले आहे.
हेही वाचा – निवडणुकीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
काय म्हणाली अभिनेत्री?
“महेश सर तुम्ही जे बोललात ते तुमचं मत होतं, जे तुम्ही मनापासून व्यक्त केलं, आम्हा सगळ्यांना तुमच्या मताचा शंभर टक्के आदर आहे. बाकी टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा कारण कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम है कहना छोडो बेकार की बातो को, हमे तो सच के साथ ही हैना,” असे म्हणत टीका करणाऱ्यांना सुनावलं आहे.
यासोबतच अभिनेत्रीने पोस्टमधून अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने उध्दव सेना जॉइन केली होती तेव्हा कोणत्याही भाजप प्रवक्त्याने तिच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर आक्षेप घेतला नव्हता! सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकरने तर मनसेच्या तिकिटावर लोकसभा लढवली होती तरी कोणी आक्षेप घेतला नाही! परंतु महेश कोठारेंनी मोदींची तारीफ केली की उध्दव सेनेला इंगळ्या डसल्या! कोठारेंवर टीकेची झोड उठवली गेली! त्यांच्या मराठीपणावर देखील शंका घेण्यात आली!”
आता या पोस्टवर अभिनेते शरद पोंक्षे यांनी “मीही मोदींचं कौतुक करतो अमित शहांच कौतुक करतो. जेजे चांगले आहेत त्यांचं करतो. सद्य परिस्थितीत भाजप शिवाय देशाला पर्याय नाही माझं मत मांडले. द्या किती शिव्या द्यायच्यात त्या.” असे म्हटले आहे. दरम्यान, शरद पोंक्षे हे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. अनेक मालिका, सिनेमे यांमधून त्यांनी भूमिका केल्या आहेत. ते सोशल मीडियावर देखील सक्रीय असून, आपले मते बेधडक मांडत असतात.




