Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारणलेखलोकसंवाद - संपादकीयव्यक्तीविशेष : आर्टिकल

सर्वसमावेशक हिंदुत्वाचा आदर्श; भाजपाकडून मीनाज इनामदार यांना उमेदवारी!

मिशन- PCMC : हिंदुत्ववादी आमदार महेश लांडगे यांच्या भूमिकेचे सर्वस्तरातून स्वागत

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवडमधील हिंदुत्ववादी आमदार महेश लांडगे आपल्या कट्टरतावादी विधानांमुळे कायम चर्चेत असतात. कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईनंतर त्यांच्यावर मुसिलमविरोधी म्हणून टीकासुद्धा झाली. किंबहुना, लव्ह जिहाद, व्होट जिहाद, धर्मांतर, गोहत्त्या बंदी आणि गोवंश संवर्धन असे मुद्दे कायम केंद्रबिंदू मानणारे महेश लांडगे यांची महापालिका निवडणुकीत आश्चर्यकारक कृती समोर आली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 नेहरुनगर- खराळवाडी प्रभागातून मीनाज फारूख इनामदार या अवघ्या 20 वर्षांच्या मुस्लिम मुलीला उमेदवारी दिली आहे. दुसऱ्या बाजुला शाहु-फुले-आंबेडकर असा विचारांचा वारसा सांगणाऱ्या राष्ट्रवादीला मात्र, एकाही मुस्लिम उमेदवाराला संधी देता आली नाही.

याबाबत AIMIM च्या महिला प्रदेशा कार्याध्यक्षा रुहीनाज शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर टीकेची झोड उडवली आहे. ‘‘अजितदादा पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील एकाही मुस्लिम कार्यकर्त्याला उमेदवारी दिली नाही.’’ असा दावा केला. तसेच, आमदार महेश लांडगे यांनी आपले समर्थक फारुख इनामदार यांच्या मुलीला संधी देत ‘‘सर्वसमावेशक हिंदुत्व’’ चा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

‘‘आपल्या आया-बहिनींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याचे डोळे काढून ठेवायची ताकद ठेवा..मग, तो कोणत्याही जाती-धर्माचा असो..’’ अशी जाहीर भूमिका घेणारे आमदार महेश लांडगे यांच्यावर कट्टरतावादी सातत्त्याने आरोप करतात. पण, महेश लांडगे आपल्या समर्थक मुस्लिम कार्यकर्त्याला संधी देतात, ही बाब निश्चितच स्वागतार्ह म्हणावी लागेल.

राज्यातीलच नव्हे, तर देशासह जगभरामध्ये प्रचंड कडवट हिंदुत्वावादी नेता म्हणून ज्यांची ओळख आहे. ते दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देशविघातक कृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्या मुसलमानांचा कायम खरपूस समाचार घेतला. त्यांच्यावर अंतरराष्ट्रीय दर्जाच्या धमक्यासुद्धा आल्या होत्या, हे संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे. मात्र, बाळासाहेबांनी आपले समर्थक साबीर शेख आणि हारुख खान यांना या दोन मुस्लिम सहकाऱ्यांना राजकीय ताकद दिली. साबीर शेख हे 1990-2000 च्या दशकात रोजगार मंत्री होते. तसेच, हारुख खान हे वर्सोवा विधानसभेचे आमदार झाले आहेत.

विधानसभा सभागृहात समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्यावर आक्रमक हल्लाबोल करणारे आमदार महेश लांडगे, धर्मांतर, लव्ह जिहाद, व्होट जिहाद सारख्या मुद्यांवर प्रखर भाष्य करणारे नेते आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी ‘‘विकासाभिमूख हिंदुत्व’’ अशी सर्वसमावेशक ‘पॉलिटिकल लाईन’ अधोरेखित केली आहे. विशेष म्हणजे, ‘‘आठरा पगड जाती, बारा बलुतेदार यांना सोबत घेवून जाणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना अभिप्रेत असलेले ‘हिंदुत्व’ आम्ही स्वीकारले आहे.’’ असे आमदार लांडगे सांगतात. ते महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने कृतीतून दाखवले.

महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा आणि राष्ट्रवादी अशी तुलना होईल. त्यावेळी मुस्लिम समाजबांधवांना प्रतिनिधीत्व या मुद्यावर भाजपा किंबहुना महेश लांडगे यांची भूमिका सरस ठरणार, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

मीनाज फारुक इनामदार कोण आहेत?

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ ब मधून कुमारी मीनाज फारुक इनामदार या भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्या सामाजिक कार्यकर्ते फारुक नादिरअली इनामदार यांची कन्या असून त्यांचे वडील गेल्या नऊ वर्षांपासून आमदार महेशदादा लांडगे यांच्या सोबत कार्यरत आहेत. आमदार महेशदादा लांडगे यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात फारुक इनामदार यांनी पिंपरी-चिंचवड शहर अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. मीनाज इनामदार यांना कौटुंबिक पार्श्वभूमीतूनच समाजसेवा, देशभक्ती व सामाजिक जाणीवेचे संस्कार लाभले आहेत. त्यांचे आजोबा नादिरअली यासीन इनामदार हे सैन्यात कार्यरत होते तसेच कुस्ती क्षेत्राशी निगडित होते. बी.कॉम पदवीधर असलेल्या मीनाज इनामदार सध्या फायनान्स मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असून प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवून विकासकामांना गती देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button