विजय वडेट्टीवारांचे आमदार संदीप धुर्वेवर टीका
गौतमी पाटील सोबत बेभान नाचण्यात व्यस्त,जनाची नाही तर मनाची लाज
महाराष्ट्र : मराठवाडा, विदर्भ, खान्देशही इतरही काही भागात अतिवृष्टीने शेतीचं मोठं नुकसान झालंय. यामध्ये सर्वाधिक फटका हा यवतमाळला बसल्याचे पाहायला मिळाले. मात्र त्याच जिल्ह्यातील अर्णीचे भाजप आमदार संदीप धुर्वेंचा गौतमी पाटील सोबतच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. त्यांनी असे म्हटले, ‘यवतमाळ जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. अशी भयानक स्थिती जिल्ह्यात असताना अडचणीत असलेल्या लोकांना वाऱ्यावर सोडून भाजपचे आमदार संदीप धुर्वे हे गौतमी पाटील यांच्यासोबत बेभान नाचण्यात व्यस्त आहे. जनाची नाहीतर मनाची लाज ठेवा’, अशी टीका वडेट्टीवार यांनी भाजप आमदारावर केली.
इतकंच नाहीतर ,झोपी गेलेले मुख्यमंत्री श्रेय लाटण्यात व्यस्त असलेले दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणे सोडून भाजपचे आमदार संदीप धुर्वे हे काय करताय? जनाची नाही तर कमीत कमी मनाची लाज ठेवून तरी संकटसमयी लोकांच्या ,शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जायला हवे होते, असे म्हणत सरकारवरही टीका केली आहे.