ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकारण

गुणरत्न सदावर्ते यांचे आदित्य ठाकरेंच्या विरोधात निवडणूक लढवण्याचे आव्हान

हिंदी बिग बॉस कार्यक्रमाचा आखाडा गुणरत्न सदावर्ते गाजवणार का?

वरळी : वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळी विधानसभा मतदारसंघातून लढण्याचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते हे हिंदी बिग बॉसमध्ये जाणार असल्यानं त्यांची चांगलीच चर्चा होतेय . त्यामुळे आदित्य ठाकरेंना बिग बॉसच्या घरातून गुणरत्न सदावर्ते आव्हान देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचे आव्हान दिल्यानंतर ठाकरे गटाकडूनही त्यांना आव्हान देण्यात आलं आहे.

सर्कसमधील लोक निवडणुकीसाठी उभे राहिल्यावर अडचणी थोडी वाढणार आहे, असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. सहा ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या हिंदी बिग बॉसमध्ये गुणरत्न सदावर्ते झळकणार आहे. दरम्यान, या शोमध्ये वाद-विवाद झाल्यास गुणरत्न सदावर्ते कायदा शिकवणार का? या प्रश्नावरही गुणरत्न सदावर्ते यांनी उत्तर दिलं आहे. ‘लोक हमसे डरते है… हम तो डंके की चोट पर बोलते है।, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button