गुलाबराव पाटील यांचा संजय राऊतांवर जिव्हारी लागणारा टोला लगावला
‘संजय राऊतांना काही काम नाही, जिथे चांगली भाजी होते तिथे मीठ टाकण्याचा राऊतांचा धंदा'

पुणे : मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वारगेटसारखे प्रकरण केल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी आज केला. इतकंच नाहीतर ते एक विकृत मंत्री असल्याचं देखील राऊतांनी म्हटलं. यासोबत माजी मुख्यमंत्र्यांवर आरोप करत त्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचं काम भाजप करतंय, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. या आरोपांवर बोलताना शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर जिव्हारी लागणारा टोला लगावला आहे. ‘संजय राऊतांना काही काम नाही, जिथे चांगली भाजी होते तिथे मीठ टाकण्याचा राऊतांचा धंदा आहे.
हेही वाचा : ‘जयकुमार गोरेंसारखे विकृत मंत्री राज्यमंत्रिमंडळात’; संजय राऊतांचा हल्लाबोल
संजय राऊत हा नौटंकी माणूस आहे. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष न देणं उचिक आहे’, असं गुलाबराव पाटील म्हणाले, तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायाला उशीर झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत असताना नैतिकतेच्या आधारावर राजीनामा झाला की वैद्यकीय कारणामुळे… याचं नेमकं कारण समोर आलं पाहिजे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. यावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आदेश मिळाल्यानंतर मुंडेंनी राजीनामा दिला आहे. आता कायद्यानुसार पुढची कारवाई जी असेल ती करण्यात येईल.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा