ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा धोका वाढला

धारशिवमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट

वाशिम : महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा धोका वाढला आहे. वाशिम जिल्ह्यानंतर आता धारशिवमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. धाराशिवच्या ढोकीमध्ये बर्ड बारा कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे पशुसंवर्धन विभागाने हालचाली वाढवल्या आहे. धाराशिवच्या ढोकी परिसरामध्ये 50 च्या आसपास कावळ्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला होता.

धारशिव जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणच्या 300 पेक्षा अधिक कोंबड्यांचे नमुने पशुसंवर्धन विभागाने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. धारशिवच्या पशुसंवर्धन विभागाकडून कोंबड्यांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. कावळ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने कोंबड्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. आता कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर आला आहे.

हेही वाचा  :  ‘जयकुमार गोरेंसारखे विकृत मंत्री राज्यमंत्रिमंडळात’; संजय राऊतांचा हल्लाबोल 

वाशिममध्ये उपयायोजना
वाशिमच्या कारंजा तालुक्यातील खेर्डा जीरापुरे येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर वाशिम जिल्हा प्रशासनाने तातडीनं उपाययोजना सुरु केल्या. बर्ड फ्लू बाधित सर्व कोंबड्यां आणि खाद्य शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. यामुळे मागील 24 तासात वाशिम जिल्ह्यात इतरत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण झाल्याची नवीन घटना उघडकीस आली नाही, अशी माहिती वाशिमचे अप्पर जिल्हाधिकारी रामेश्वर घुगे यांनी दिली.

अंडे-चिकन करताना हे लक्षात ठेवा
चिकन आणि अंडी 70 डिग्री सेल्सियस तापमानात शिजवून घ्या.
कच्ची इन्फेक्टेड अंड्यांचे सेवन करु नका.
चिकन शिजवल्यानंतर हात स्वच्छ धुवून घ्या.
बर्ड फ्लूचा प्रभाव असलेल्या 10 किलोमीटर परिसरात राहू नका.
सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, अंग दुखणे अशी लक्षणे असल्यावर रुग्णालयात जा.
पक्षी किंवा इतर प्राण्यांचा मृत्यू झाल्यावर त्याची माहिती पशूसंवर्धन विभागाला द्या.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button