Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘आम्ही पवारांना नेहमी घाबरून असतो’; गुलाबराव पाटलांची शाब्दिक टोलेबाजी

पवारांची जी बुद्धी चालते, तेवढी कुणाचीच चालत नाही

मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर शाब्दिक टोलेबाजी केली आहे. आम्ही पवारांना नेहमी घाबरून असतो. त्यांच्यासारखी बुद्धी कुणाचीही चालत नाही, असं गुलाबराव पाटील म्हणाले. ते जळगाव येथे एका विवाह सोहळ्यात बोलत होते.

नवरी मुलगी पवार कुटुंबातून येते. त्यामुळे आम्ही पवारांना घाबरूनच आहोत. तुम्ही सकाळी-सकाळी शपथ घेऊन टाकता आणि काहीही करून टाकता. आम्हाला काही कळू देत नाही. आम्ही पवारांना नेहमी घाबरून असतो. त्यामुळे पवरांना कायम बरोबर ठेवावं लागतं. कारण पवारांची जी बुद्धी चालते, तेवढी कुणाचीच चालत नाही, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

राजकारणाचा आणि विरोधाचा भाग सोडा पण हा लग्न सोहळा आहे. हा कोणत्याही पक्षाचा कार्यक्रम नाही. व्यक्तीच्या घरातला कार्यक्रम आहे. माणुसकीतला हा सोहळा आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना खूप खूप आशीर्वाद देतो, असं गुलाबराव पाटील म्हणाले. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button