Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

नोटाबंदीची पहिली माहिती गुजरातला, आता गॅस टंचाईबाबतही तिथेच रांगा; संजय राऊतांचा दावा

मुंबई | आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता भारतावरही होताना दिसत आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये गॅस आणि इंधन मिळण्यात अडचणी येत असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. या परिस्थितीवरून शिवसेना (ठाकरे गट) चे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर तीव्र टीका केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की लॉकडाऊन, गॅस टंचाईसारख्या अफवा पसरवू नये. हा अपराध आहे. त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. पण महाराष्ट्रात ठिकठिकाणी गॅसच्या रांगेत लोक आजारी पडतात. तुमचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ स्वतः कबूल करत आहेत की गॅसची टंचाई आहे. एका ठराविक मर्यादेपलीकडे पुरवठा करता येणार नाही, असे खुद्द मंत्री म्हणत असतील, तर अफवा कोण पसरवतंय? असा सवाल संजय राऊतांनी केला.

हेही वाचा     :              25 दिवस होऊनही गॅस सिलिंडर मिळेना; आता एका कॉलवर करा थेट तक्रार 

आधी तुमच्या कॅबिनेटमध्ये एकमत आहे का ते तपासा. तुमचेच लोक गॅसवर आहेत. पोलीस बंदोबस्तामध्ये तुम्हाला सिलेंडरचे वितरण करावे लागत आहे. या अफवा गुजरातमधून पसरवल्या जात आहे. सर्वात जास्त रांगा या गुजरातमध्ये लागल्या आहेत. नोटाबंदीसंबंधीची पहिली माहिती ही गुजरातमध्ये कळली. गुजरातमध्ये ८ दिवस आधीच लोकांनी बँकेत रांगा लावून आपला काळा पैसा आत टाकला. अमित शाहांच्या बँकेत एका तासात ५०० कोटी जमा झाले. त्या राज्यातील पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री असल्याने त्यांना ही बातमी लवकर कळली, असा दावा संजय राऊत यांनी केला.

गुजरातमध्ये सिलेंडरसाठी ज्या रांगा लागल्या आहेत, त्यावरुन लोकांच्या मनात धास्ती आहे की पुन्हा लॉकडाऊन लागेल. टंचाई होणार आहे. ही हवा गुजरातमधून आलेली आहे. पेट्रोल, डिझेलसाठी मोठमोठे ड्रम घेऊन लोक उभे आहेत. जर मुख्यमंत्र्‍यांना गुन्हा दाखल करायचा असेल तर त्यांनी गुजरात राज्याच्या विरुद्ध करावा. देशभरात अफवा पसरवण्याचे काम तिथूनच होत आहे. सध्या सिलेंडरच्या वितरणासाठी पोलिसांचा बंदोबस्त लावावा लागत आहे, ही राज्यासाठी शरमेची बाब असून सरकारने जनतेला घाबरवण्यापेक्षा पुरवठा सुरळीत करण्यावर भर द्यावा, असही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button