मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढला जीआर!
![Govt issued GR regarding Maratha reservation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/eknath-shinde-ajit-pawar-and-devendra-fadnavis-780x470.jpg)
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरवाली सराटी या गावात उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घोषणेनंतर अधिकृत जीआर सरकारकडून जारी करण्यात आला आहे. नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी दाखले देण्याचा हा जीआर आहे.
मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी करत मनोज जरांगे यांचं गेल्या दहा दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. ज्यांकडे निजामकालीन कुणबी अशा नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर आता राज्य सरकारकडून याबाबतचा अधिकृत जीआर काढण्यात आला आहे.
हेही वाचा – चक्क पक्ष्यासारखा हवेत उडणारा ‘हा’ मासा तुम्ही कधी पहिला आहे का?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल निर्देश दिल्याप्रमाणे मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींची समिती नेमण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. याशिवाय मनोज जरांगे पाटील यांना आपले उपोषण मागे घेण्याची विनंती करणारे पत्रही देण्यात आले आहे.