ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या कपड्यांचे महत्त्व काय?

मोठ्या रात्रीला निरोप देण्याची परंपरा, वैज्ञानिक कारण म्हणजे, काळा रंग हिवाळ्यामध्ये उष्णता शोषतो

महाराष्ट्र : मकर संक्रांतीचा सण भारतामध्ये अगदी पुरातन काळा पासून साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या ओळखीच्या लोकांच्या हातावर तिळाचा लाडू ठेवला जातो. त्यासोबतच ‘तिळ गुळ घ्या, आणि गोड बोला’ असे देखील म्हटले जाते. मकर संक्रांतीच्या दिवसी अनेक घरांमध्ये महिला एकमेकांना हळदी कुंकू लावून वाण देतात. यामुळे घरातील सदस्याची नाती घट्ट होतात आणि नवीन नाती जोडण्यास मदत होते. मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक घरांमध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम देखील केला जातो. जिथे महिला एकत्र येऊन खेळ खेळतात आणि एकमेकांसोबत वेळ घालवतात.

मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर कुंडलीतील सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. पौष महिन्यातील सूर्य उतरायण होऊन मकर राशीमध्ये प्रवेश करतो. मकर संक्रांत भारतातील वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा केली जाते. मकर संक्रांती हा सण भरतामध्ये १४ जानेवारी रोजी साजरी केली जाते. मकर संक्रांतीला अनेक ठिकाणी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जातात. त्या मागच्या विशेष गोष्टी चला जाणूव घेऊया. मान्यतेनुासर, सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी त्याची पत्नी छाया म्हणजेच सावली यांनी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते ज्यामुळे हि प्रथा पुढे कायम राहिली. या कारणामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या टिपक्यांची काळी साडी नेसली जाते. या काळ्या रंगाच्या साडीला ‘काळी चंद्रकाळ’ देखील म्हटले जाते.

भरतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण वेगवेगळ्या ऋतूमध्ये साजरा केला जातो त्यामुळे त्यांची पद्धत वेगळी असते. आपल्याकडे मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. काळ्या रंगाला हिंदूधर्मानुसार, अशुभ मानले जाते परंतु, मकर संक्रांत हा एकमेव सण आहे ज्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. काळ्या रंगाचे कपडे उष्णता शोषून घेतात ज्यामुळे शरीर उबदार राहाण्यास मदत होते. मकर संक्रांत हिवाळ्यात साजरा केला जातो त्यामुळे या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जाते. मकर संक्रांतीचा सण येताच बाजारामध्ये अनेक प्रकारचे काळ कपडे आणि साड्या पाहाला मिळतात.

नवविहाहित वधूंसाठी मकर संक्रांत हा सण अगदी महत्त्वाचा मानला जातो. नवविवाहित वधूंना मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची साडी भेट म्हणून दिली जाते. काळे कपडे घालण्याच्या मागचे वैज्ञानिक कारण म्हणजे, पांधरा रंग उष्णता शोषून घेत नाही तसेच काळा रंग हिवाळ्यामध्ये उष्णता शोषतो ज्यामुळे शरीर उबदार राहाते. मकर संक्रांतीच्या दिवशी नवविवाहित महिलांना हलव्याचे दागिणे घालून थाटामध्ये हा सण साजरा केला जातो. काळ्या रंगाच्या साडीवर पाढरे शुभ्र हलव्याचे दागिणे उठून दिसतात त्यामुळे देखील मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात.

मकर संक्रांतीचा पौराणिक महत्त्व
मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा नदीचं पृथ्वीवर आगमन झाले होते. मकर संक्रांत जानेवारी महिन्यातील पहिला सण म्हणून साजरा केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो . सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण याला संक्रांत असे म्हणतात. मकर संक्रांतीला उतरायण देखील म्हटले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते. मककर संक्रांतीच्या दिवशीपासून दिवस मोठा होतो आणि तिळ तिळ वाढू लागतो आणि रात्र लहान होते. त्यामुळे या दिवशीी काळ्या रंगाचे कपडे परिधान करून मोठ्या रात्रीला निरोप देण्याची परंपरा असते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button