Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुणे जिल्ह्यातील रुग्णालयांच्या फायर ऑडिटसाठी पार्थ पवार सरसावले !

  • जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना मागणी 
  • आवश्यक उपाययोजना तात्काळ करण्याची सूचना

पुणे । प्रतिनिधी

अहमदनगर जिल्ह्यातील  शासकीय रुग्णालयात अतिदक्षता (आयसीयू) विभागात आगलागल्यामुळे १० जणांचा मृत्यू झाला. या घटनेची पुनरावृत्ती होवू नये. यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडिट करावे, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते पार्थ पवार यांनी केली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी सौरभ राव,  पुणे महापालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त रोश पाटील यांचे लक्ष वेधले आहे.

महाराष्ट्र फायर प्रिव्हेंशन अॅँड लाइफ सेफ्टी मेजर्स अॅक्ट २००६ च्या अनुषंगाने फायर सेफ्टी ऑडिटची प्रभावी अंमलबजावणीच्या मार्गदर्शक सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. राज्यातील सर्व रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये तसेच अन्य आरोग्य संस्थांचे फायर सेफ्टी ऑडिट त्वरित करणे अपेक्षीत आहे. त्यानुसार आरोग्य संस्थांमध्ये त्रुटी राहिल्यास त्याची पूर्तता करण्यात यावेत. फायर एस्टिंगविशर, बांधकाम संरचनाबाबत आदी फायर सेफ्टी प्राधिकरणाची पूर्तता प्रमाणपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button