Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

आताच्या आता कर्जमुक्ती करा, तातडीने… उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, सरकारला मोठा इशारा

मुंबई : उद्धव ठाकरे आजपासून चार दिवस मराठवाडा दौर्‍यावर आहेत. सध्या उद्धव ठाकरे हे पैठण तालुक्यातील नांदर गावात पोहोचले आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतकर्‍यांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारने दिलेली अतिवृष्टी नुकसानीची भरपाई प्रत्यक्षात किती मिळाली, मिळाली की नाही याची माहिती घेतली. आताच्या आता कर्जमुक्ती करा, तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये द्या, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

मी कोणताही राजकीय प्रचार करायला आलो नाही. तुम्ही सर्व कंटाळला आहात. दरवेळी निवडणुका आल्यावर आम्ही राजकीय नेते येतो. तुमच्या कोपराला गुळ लावून जातो. तुम्ही भोळेभाबडे आहेत. स्वप्न दाखवलं की बळी पडता आणि आपलं आयुष्य देऊन टाकता. मराठवाड्यावर गेल्या वर्षभरात आपत्तीपासून आपत्ती येत आहे. पाऊस थांबायचं नाव घेत नाही. आता पाऊस पाठच सोडणार नाही असं वाटतंय. कधी नव्हे ते एवढं मोठं संकट मराठवाड्याने अनुभवलं. मराठवाड्यावर कधी एवढी मोठी आपत्ती कोसळली असेल माहीत नाही.

हेही वाचा –  ‘युती की स्वबळ?’ आगामी निवडणुकांसाठी भाजपची जोरदार फिल्डिंग

ज्येष्ठ शेतकऱ्यांनी सांगितलं असा पाऊस पाहिला नहाी. मी तेव्हाही आलो होतो. माझ्या दौऱ्याची टिंगल केली. मी शेतकऱ्यांशीच बोललो. तुमची मागणी मांडली. एक तर हेक्टरी ५० हजार मिळाले पाहिजे ही मागणी बरोबर की चूक तुम्हीच सांगा. थकीत कर्ज फेडणार कसं. हातातील पिक गेलं. खरीप गेलं. रब्बी कसं घेणार जमीन खरडून गेलं आहे.दयावान सरकारचा अभ्यास सुरू आहे. मी माझं मोठेपण सांगत नाही. मुख्यमंत्री असताना कर्तव्य केलं. अनपेक्षितपणे मुख्यमंत्री झालो. मी कर्तव्य म्हणून केलं. समिती नेमली नाही. मी कर्जमुक्ती केली. हे अभ्यास करत आहेत. सर्व शेतकऱ्यांची सर्कल निहाय माहिती सरकारकडे आहे. महात्मा फुलेंच्या नावाने कर्जमुक्ती योजना राबवली. त्याची माहिती सरकारकडे आहे. परदेशी समिती नेमली. परदेशी समिती येणार आणि स्वदेशी समिती नेमली

गेल्या आठवड्यात काही तरी होईल वाटलं होतं. सर्व एकजूट झाले होते.परत मुख्यमंत्र्यांनी गुळ लावला. कर्ज कसं फेडणार. पॅकेज ही थट्टा आहे. अर्धवट पॅकेज आहे. ते पॅकेजच नाहीये. पीक विम्याचे पैसे मिळाले नाही. कुणी पीक विमा भरला होता का. त्याची माहिती घेतली होती. ज्याने भरला त्याने सांगा, तुम्हाला नुकसानीची किती रक्कम मिळायला हवी होती.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button