पंतप्रधान मोदींच्या यवतमाळ सभेसाठी १२ कोटींचा खर्च, जनतेच्या पैशांतून उधळपट्टी

यवतमाळ | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळच्या दौऱ्यावर येत असून यावेळी ते विविध योजनांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच पीएम-किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याचे वितरणदेखील करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. तर या एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी तब्बल १२ कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
यवतमाळ येथील जाहीर कार्यक्रमात मोदींच्या हस्ते किसान सन्मान निधी योजनाचा १६ वा हप्ता थेट लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी चा सुमारे ३८,००० कोटी रूपयांचा दुसरा व तिसरा हप्तादेखील वितरित केला जाणार आहे. तर याचा लाभ ८८ लाख शेतकऱ्यांना होणार असून यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितांना संबोधित करणार आहेत. याची मोठी तयारी केली गेली असून ४५ एकरवर मंडप उभरण्यात आला आहे.
हेही वाचा – मनोज जरांगेंना बीडमधून लोकसभेची उमेदवारी देणार? शरद पवारांची मिश्किल टिप्पणी
नरेंद्र मोदींच्या सभेसाठी भाजपकडून तसेच महायुतीकडून अमाप पैसा खर्च करण्यात आला आहे. यावरून वडेट्टीवारांनी जोरदार टिका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १ दिवसाच्या कार्यक्रमासाठी जनतेच्या १२ कोटी ७३ लाख रुपयांचा चुराडा महायुती सरकार करणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही तासांच्या कार्यक्रमासाठी खर्च केलेल्या इतक्या सरकारी निधीत यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब पुन्हा नव्याने उभे राहू शकले असते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 1 दिवसाच्या कार्यक्रमासाठी जनतेच्या 12 कोटी 73 लाख रुपयांचा चुराडा महायुती सरकार करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
काही तासांच्या कार्यक्रमासाठी खर्च केलेल्या इतक्या सरकारी निधीत यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब पुन्हा… pic.twitter.com/bBmVqYcn81
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 28, 2024
आधीच राज्याच्या डोक्यावर ८ लाख कोटीहून अधिक कर्ज झाले आहे. त्यात आर्थिक शिस्त न पाळणारे राज्यकर्ते सत्तेत. पंतप्रधानांचा कार्यक्रम असो की शासन आपल्या दारी आपली जाहिरात आणि प्रचार झालाच पाहिजे ‘ होऊ दे खर्च ‘ या सूत्राचे पालन करत महायुतीची उधळपट्टी सुरू आहे, असे वडेट्टीवारांनी सांगितले आहे.