Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

EPFO UPI PF Withdraw: मे पावणार! युपीआयमधून काढा पीएफचा पैसा, किती रक्कम काढता येणार

EPFO UPI PF Withdraw: केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता दिली आहे. पीएफ काढणे अधिक सोपे आणि सुलभ होणार आहे. मीडियातील वृत्तानुसार, मे 2026 च्या अखेरीस देशभरातली कर्मचारी युपीआयच्या माध्यमातून पीएफ काढू शकतील, असा दावा करण्यात येत आहे. ईपीएफओचे नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म CITES 2.0 अंतर्गत हा बदल करण्यात येईल. त्यामुळे कोट्यवधी सदस्यांना झटपट पीएफ काढता येईल.

ईपीएफओमध्ये सध्या 7.98 कोटी सदस्य आहेत. तर 82 लाखाहून अधिक पेन्शनर्स आहेत. त्यातील 7.74 कोटी सदस्यांची केवायसी करण्यात आलेली आहे.ईपीएफओच्या पोर्टलवरील माहितीनुसार गेल्या एका वर्षात रक्कम काढण्यासंबंधीचे 6.42 कोटी दावे निकाली काढण्यात आले आहे. नवीन डिजिटल प्लॅटफॉर्मनुसार पीएफ काढताना आता झंझट उरणार नाही. UAN च्या माध्यमातून लॉगिन करता येईल. OTP व्हेरिफाय झाल्यानंतर युपीआयच्या माध्यमातून पैसे वळते होतील.

हेही वाचा –  बाद झाल्यावर बॅटवर काढला राग अन् IPLने थेट खिसा केला रिकामा! ‘केकेआर’च्‍या रघुवंशीला दंड

नवीन सिस्टिम लागू झाल्यानंतर पीएफ काढण्याची पद्धत अमुलाग्रपणे बदलले. सदस्यांना सर्वात अगोदर UAN, युनिव्हर्सल अकाऊंट क्रमांकाच्या मार्फत EPFO पोर्टल वा मोबाइल ॲपवर लॉगिन करावे लागेल. लॉगिन केल्यावर एकूण बॅलेन्स आणि काढण्यायोग रक्कम दिसेल. त्यानंतर तुमच्या गरजेनुसार तुम्हाला रक्कम काढता येईल. त्यासाठी UPI ID टाकावी लागेल. OTP व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यावर पैसे थेट बँक खात्यात जमा होतील. या प्रक्रियेमुळे कागदी कारवाई कमी होईल आणि गरजेचेवेळी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. त्यांना लागलीच पैसे काढता येतील.

केंद्र सरकारने या सुविधेसोबत एक सुरक्षा कवचही दिले आहे. नवीन नियमानुसार, कोणताही कर्मचारी त्याच्या पीएफ खात्यातून एकदा पूर्ण पैसे काढू शकणार नाही. आता कमाल 75% रक्कम काढता येईल. तर 25% रक्कम पीएफ खात्यात शिल्लक ठेवणे आवश्यक असेल. ईपीएफ स्कीम योजना 2026, EPS 2026, EDLI Scheme 2026 सारख्या सोयीसुविधा लागू होऊ शकतात. त्यामुळे पीएफ, पेन्शन आणि विम्याशी संबंधित नियम अधिक मजबूत होतील. या नियमातंर्गत अनेक बदल होतील.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button