२४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर; निवडणूक आयोगाची घोषणा

मुंबई | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. आज निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यभरात नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी निवडणूक होईल तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हापरिषद व महानगर पालिकांसाठीच्या कार्यक्रमाची घोषणा केली जाईल.
राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, २ डिसेंबर रोजी महाराष्ट्रभरात नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाईल. १० डिसेंबर रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर केले जातील.
हेही वाचा : पिंपरी महापालिका निवडणुक: आरक्षण सोडतीसाठी चंद्रकांत पुलकुंडवार प्राधिकृत अधिकार
असा असेल निवडणूक कार्यक्रम
१० नोव्हेंबर – उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात
१७ नोव्हेंबर – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
१८ नोव्हेंबर – उमेदवारांच्या अर्जांची पडताळणी
२१ नोव्हेंबर – अपील नसलेल्या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत
२५ नोव्हेंबर – अपील असलेल्या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत
२६ नोव्हेंबर – निवडणूक चिन्ह नेमून देणे व उमेदवार यादी प्रसिद्ध करणे
२ डिसेंबर – मतदानाचा दिवस
३ डिसेंबर – मतमोजणी
१० डिसेंबर – निकाल जाहीर केला जाणार




