Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड ठरणारा अर्थसंकल्प’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Budget 2025 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात त्यांनी १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले. मध्यम वर्गाने या निर्णयाचे स्वागत केले असताना आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी मध्यम वर्गासाठी एक स्वप्नवत असा अर्थसंकल्प मांडला आहे. अपेक्षेपेक्षा अधिक देण्याचा प्रयत्न केला आहे. १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. सात लाखांची असलेली मर्यादा थेट १२ लाखांपर्यंत नेण्यात आली आहे. त्यामुळे आता १२ लाख उत्पन्न असलेल्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. याचा मोठा फायदा मध्यम वर्गीय, नोकरदार आणि तरुणांना होणार आहे. यामुळे मोठे उत्पन्न मध्यमवर्गींच्या खिशात येणार आहे. हे उत्पन्न खर्च करताना देशातील मागणी वाढेल. ज्याचा थेट फायदा सूक्ष्म, लघू आणि मध्यम उत्पादनांना होईल. यातून रोजगार निर्मितीही होईल.

हेही वाचा  :  Union Budget 2025 | मध्यमवर्गाला दिलासा! १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त; नवी कररचना कशी?

या अर्थसंकल्पात धीराने आणि धाडसाने घेतलेला निर्णय भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड ठरेल, असे माझे मत आहे. यासोबत शेती क्षेत्रासाठी १०० जिल्ह्यांमध्ये ठरवून शेती क्षेत्राचा विकास करण्याची योजना आणली जाणार आहे. तसेच तेलबियांचे उत्पादन झाल्यानंतर केंद्र सरकार १०० टक्के खरेदी हमीभावाने करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच अधिक उत्पादन मिळणार आहे. मच्छिमारांनाही क्रेडीट मर्यादा ३ लाखांवरून ५ लाखांपर्यंत बिनव्याजी वाढविण्यात आली आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button