पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होतोय ‘हा’ चित्रपट, ‘धुरंधर’ अन् ‘मर्दानी ३’ला मागे टाकत पटकावले अव्वल स्थान

Trending Movie : ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला अनेक चित्रपट आणि वेबसीरिज प्रदर्शित होत असतात. प्रेक्षक पसंतीमुळे चित्रपट आणि वेबसीरिज अल्पावधीत ट्रेंडसुद्धा होतात. अशातच एका चित्रपटाची ओटीटीवर चर्चा सुरू आहे. १५ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे.
आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, त्याचे नाव आहे टोस्टर. सध्या नेटफ्लिक्सवर राजकुमार रावच्या या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. हटके विषयामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ‘टोस्टर’ने अनेक बिग बजेट चित्रपटांना मागे टाकत पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे.
हेही वाचा – ‘धुळे व नंदुरबार जिल्हे भविष्यातील प्रमुख औद्योगिक केंद्रे बनणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राजकुमार रावचा कॉमेडी-ड्रामा चित्रपट ‘टोस्टर’ १५ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि अल्पावधीतच या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. रणवीर सिंहचा ‘धुरंधर’ आणि राणी मुखर्जीचा ‘मर्दानी ३’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांना मागे टाकून ‘टोस्टर’ सध्या नंबर १ वर ट्रेंड करत आहे. प्रेक्षक या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देत असून, आयएमडीबीवर याला ४.७ रेटिंग मिळाले आहे.
हा चित्रपट केवळ भारतातच नाही, तर जागतिक स्तरावरही नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. भारताव्यतिरिक्त पाकिस्तान आणि बांगलादेशमध्येही हा चित्रपट पाहिला जात आहे. इतकेच नव्हे तर, गेल्या आठवड्यात नेटफ्लिक्सवरील टॉप १० बिगर इंग्रजी चित्रपटांच्या यादीत ‘टोस्टर’ १५ देशांमध्ये ट्रेंड होत होता.
नेटफ्लिक्सने १३ ते १९ एप्रिल २०२६ या कालावधीसाठी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ‘टोस्टर’ या चित्रपटाने आपल्या प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात ९२ लाख तासांच्या व्ह्यूइंग अवर्ससह ४४ लाख व्ह्यूज मिळवले आहेत.





