Union Budget 2025 | मध्यमवर्गाला दिलासा! १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त; नवी कररचना कशी?

UnionBudget2025 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात प्राप्तीकर स्लॅबमध्ये बदल करण्यात आला असून १२ लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर १ लाख कोटींचा बोजा पडणार आहे. मात्र तो सहन करुन सरकारकडून ही भेट मध्यमवर्गाला देण्यात आली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, पुढील आठवड्यात नवीन प्राप्तीकर विधेयक आणले जाईल. आम्ही निर्यात क्षेत्रात योजना सुरू करू. एमएसएमईंना परदेशात टॅरिफ सहाय्य मिळेल. पुढील आठवड्यात नवीन विधेयक आणले जाईल. या प्रत्यक्ष कर सुधारणा नंतर स्पष्ट केल्या जातील. विमा क्षेत्रासाठी एफडीआय मर्यादा वाढवणार आहे अशाही घोषणा त्यांनी केल्या.
हेही वाचा : आज माघी गणेश जयंती! ‘अशी’ करा बाप्पाची आराधना; वाचा शुभ मुहूर्ताची अचूक वेळ
कशी आहे नवी कररचना?
० ते ४ लाख रुपये – कर नाही
४.०१ – ८ लाख – ५ टक्के
८.०१ – १२ लाख – १० टक्के
१२.०१ – १६ लाख – १५ टक्के
१६.०१ – २० लाख – २० टक्के
२०.०१ – २४ लाख – २५ टक्के
२४ लाखांपेक्षा अधिक – ३० टक्के