काँग्रेस लोकसभेच्या ३०० जागा लढवणार, महाराष्ट्रात किती जागा?

Lok Sabha Election 2024 | लोकसभा २०२४ निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. जागावाटपावरून राजकीय पक्षांमध्ये खलबंत सुरू आहेत. काँग्रेस आपल्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. कॉंग्रेस लोकसभेच्या ५४३ जागांपैकी ३०० जागा लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे.
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची गुरुवारी (ता. ७) दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, निवडणूक समितीतील अनेक नेते, प्रभारी उपस्थित होते. त्याचबरोबर बैठकीत संबंधित राज्यांमधील वरिष्ठ नेत्यांची देखील उपस्थिती होती.
हेही वाचा – धक्कादायक! भावाच्या लग्न समारंभात नाचताना १५ वर्षीय तरूणाचा मृत्यू
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सीईसी बैठकीत ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ६० लोकसभा जागांवर चर्चा झाली. यापैकी ४० उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. यामध्ये दिल्ली, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, तेलंगणा, सिक्कीम, त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, मेघालय आणि लक्षद्वीपच्या लोकसभेच्या जागांचा समावेश आहे.
काँग्रेसला महाराष्ट्रात किती जागा?
महाष्ट्रात कॉंग्रेसने २०१९ मध्ये २५ जागा लढवल्या होत्या. मात्र कॉंग्रेसला फक्त एक जागा मिळाली होती. यावेळी काँग्रेस १५ जागांवर लढू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.





