ताज्या घडामोडीराजकारण

काँग्रेस हायकमांडचे नाना पटोले यांच्या राजीनाम्यावर भाष्य

विधानसभेच्या पराभवाचा आढावा घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल

दिल्ली : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्तास्थापनेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज्यात महायुतीला बहुमत मिळाले असून महाविकासआघाडीचा सुपडासाफ झाला आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानतंर आता नाना पटोलेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. आता यावर काँग्रेस हायकंमाडने मोठा निर्णय घेतला आहे.

राज्यात एकीकडे सत्तास्थापनेचा गडबड सुरु असताना दुसरीकडे काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला दारूण पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. यानंतर नाना पटोले हे दिल्लीला रवाना झाले. त्यांनी २४ नोव्हेंबरला काँग्रेसच्या हायकमांडची भेट घेतली. या भेटीत नाना पटोले यांनी पराभवाची सर्व जबाबदारी स्वीकारली. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी हायकमांडकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. मात्र नाना पटोले यांचा राजीनामा अद्याप काँग्रेसच्या हायकमांडने स्वीकारलेला नाही. त्यामुळे नाना पटोले हे वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते.

आता काँग्रेस हायकमांडकडून नाना पटोले यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले आहे. ही राजीनामा देण्याची वेळ नाही. हा फक्त प्रदेशाध्यक्षपदाचा मुद्दा नाही. हा निवडणुकीत झालेल्या हेराफेरीचाही मुद्दा आहे. त्यामुळे आता तुम्ही राजीनामा देऊन मीडियासमोर चुकीचा नरेटिव्ह सेट करु नका. हायकंमाडच्या निर्णयाची प्रतीक्षा करता. प्रदेशाध्यक्ष पदावर कायम राहा. विधानसभेच्या पराभवाचा आढावा घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेस हायकमांडने सांगितले आहे.

तसेच काल काँग्रेसच्या मीडिया सेलने नाना पटोलेंनी राजीनामा दिल्याचं वृत्त फेटाळून लावलं होतं. नाना पटोलेंनी राजीनामा दिलेला नाही. यासंदर्भातल्या बातम्या असत्य असून त्या खोडसाळपणे पसरवल्या जात आहेत, असे काँग्रेसच्या मिडिया सेलकडून सांगण्यात आले होते. त्यातच आता काँग्रेस हायकमांडने दिलेल्या आदेशानुसार पुढील निर्णय होईपर्यंत नाना पटोले हेच प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button