Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘होलार समाजाच्या अभ्यासासाठी समिती गठीत करणार’; मंत्री संजय शिरसाट

मुंबई : होलार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्यात येईल. या समितीच्या अहवालाच्या आधारे समाजाच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येतील, असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

मंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली होलार समाजाच्या विविध प्रश्नाबाबत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, दूरदृश्य प्रणालीद्वारे समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ – मुंडे, होलार समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा –  ‘विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्तीने शिक्षण घेतानाच मैदानी खेळांनाही प्राधान्य द्यावे’; राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, होलार समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ‘संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ‘ अंतर्गत होलार समाज आर्थिक विकास महामंडळ या स्वतंत्र उपकंपनीची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे. समाजासाठी शासनाच्या विविध योजना अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचाव्यात यासाठी विशेष परिपत्रक जारी करण्यात येणार आहे. हे परिपत्रक राज्यातील सर्व जिल्हा कार्यालयांना पाठविण्यात येणार असून त्याद्वारे संबंधित योजनांची माहिती समाजबांधवांपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात येईल.

मंत्री शिरसाट म्हणाले की, होलार समाजाच्या विविध मागण्या आणि प्रश्नांना न्याय देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. समाज प्रतिनिधींसोबत सातत्याने संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जात आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button