Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्यापासून आयोध्या दौऱ्यावर; असा असणार संपूर्ण दौरा

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्यापासून दोन दिवसाच्या अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यावेळी ते प्रभू रामचंद्राचे दर्शन घेणार आहेत. नंतर शरयू नदीवर महाआरती करणार आहेत. तसेच अयोध्या दौऱ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत.

महाराष्ट्रातील सत्तांतराच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याला मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री, आमदार, पदाधिकारी अयोध्येला जाणार आहेत. या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिंगे गटाचे अनेक पदाधिकारी आधीपासूनच आयोध्येत दाखल झाले आहेत.

८ एप्रिल रोजी एकनाथ शिंदे लखनऊला पोहोचतील. आमदार, खासदारांसह ते लखनऊच्या हॉटेलमध्ये मुक्काम करतील. तर ९ एप्रिल रोजी लखनऊमधील मुक्कामानंतर मुख्यमंत्री एकनात शिंदे अयोध्येत दाखल होतील. दुपारी १२ वाजता श्रीरामाची महाआरती करतील. १२.३० वाजता राम मंदिराच्या कामाची पाहणी करतील. २.३० वाजता पत्रकार परिषद घेतील. दुपारी ३ अयोध्येतील लक्ष्मण किल्ल्याला भेट देतील, संध्याकाळी ६ वाजता शरयू नदीवर महाआरती आणि रात्री ९ वाजता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button