Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट ही शरद पवारांचीच खेळी..’; पवारांच्या सहकाऱ्याचा दावा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ऊभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणीवस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे ज्येष्ठ सहकारी चंद्रराव तावरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

चंद्रराव तावरे म्हणाले की, मी ४० वर्षे शरद पवारांबरोबर राजकारणात होतो. मी निवडणुकीत त्यांचा प्रचारही केला आहे. त्यांचा स्वभाव कसा आहे मला माहित आहे. त्यांच्यात कधीही फूट पडू शकत नाही. हे सगळे लोक एकच आहेत. हे सगळे दाखवण्यासाठी वरच्या लोकांना सांगण्यासाठी हे सगळं चाललं आहे. कारण त्यांच्यावर ज्या काही कारवाया होणार आहेत त्या टाळण्यासाठी हे पाऊल शरद पवारांनी उचलले असावं.

हेही वाचा – औंध ITI येथे ३३ व्यवसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु

शरद पवार आत्ता जे करत आहेत त्याच्याही पुढे जाऊ शकतात. कारण कायद्याचा बडगा उगारला गेला तर कुटुंबाची वाताहात होणार आहे. अडचण टाळण्यासाठी शरद पवारांनी हे सगळं घडवलं आहे. अडीच वर्षांचं सरकार झालं, त्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री होते. ते सरकार पाडायची काय आवश्यकता होती? पहाटेच्या शपथविधीला काय काय घडलं हे आपल्याला माहित आहे. विविध चौकशांमधून सुटण्यासाठी शरद पवारांनी हा कार्यक्रम केला आहे, असा दावाही चंद्रराव तावरे यांनी केला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button