ताज्या घडामोडीराजकारण

जनगणनेचे चक्र बदलणार,देशात जनगणनेस सुरुवात

अनेक विरोधी पक्षांकडून जातीय जनगणनेची मागणी

दिल्ली : देशात आता जनगणनेस सुरुवात होणार आहे. परंतु जनगणनेचे चक्र बदलणार आहे. नेहमी दहा वर्षांनी होणारी जनगणना यंदा 14 वर्षांनी होणार आहे. 2011 नंतर आता 2025 मध्ये जनगणना होणार असून त्यानंतर 2035, 2045, 2055 अशी पुन्हा दहा, दहा वर्षांनी जनगणना होणार आहे. यापूर्वी 1991, 2001, 2011 अशी जनगणना झाली होती. आता 2025 मध्ये होणाऱ्या जनगणनेमध्ये संप्रदायाची माहिती घेतली जाणार आहे. 2025 मध्ये सुरु होणार जनगणना 2026 पर्यंत चालणार आहे. 2021 मध्ये कोरोनामुळे जनगणना झाली नव्हती. परंतु या जनगणनेत जातीय जनगणना होणार का? यासंदर्भात कोणताच खुलासा अजून झालेला नाही.

अनेक विरोधी पक्षांकडून जातीय जनगणनेची मागणी होत आहे. मात्र सरकारने अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही. जनगणनेत धर्म आणि वर्ग विचारले जातात. सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि जमातीची गणना केली जाते. या वेळी लोकांना ते कोणत्या पंथाचे अनुयायी आहेत हे देखील विचारले जाऊ शकते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button