निधीवाटपावरून भाजप आमदार नाराज, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहलं पत्र
![BJP MLA upset over fund allocation, writes letter to Deputy Chief Minister Devendra Fadnavis](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/devendra-fadnavis-and-dadarao-keche-780x470.jpg)
मुंबई : भाजपा आमदार दादाराव केचे यांनी निधी वाटपावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. आष्टी व कारंजा नगरपंचायतींसाठी निधी दिला नसल्याचा आरोप आमदार दादाराव केचे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. ९ कोटी ८३ लाखांऐवजी १० कोटी रुपये निधी देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
आमदार दादाराव केचे पत्रात म्हटले आहे की, कारंजासाठी दिलेला निधी आष्टीत व आर्वीत वळता करा. मागणी नसताना हा निधी मंजूर कसा झाला?फडणवीस हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्या निधी मंजूर करण्याच्या अधिकारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करीत तीन दिवसांत मंजूर केलेला निधी तात्काळ रद्द करावा व तो आर्वीला द्यावा, असा निर्णय न घेतल्यास मला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल, असा इशारा केचे यांनी दिला आहे.
हेही वाचा – भाऊराव कऱ्हाडेंचा टीडीएम ‘या’ दिवशी पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला
आमदार मी असल्याने माझ्या पत्रावर निधी मिळावा. पत्र नसताना निधी कसा? आज मंत्रालयात काम असून उद्या पक्षाची मीटिंग आहे. त्यानंतर बघू, असंही दादाराव केचे म्हणाले.