breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमनोरंजनमहाराष्ट्र

भाऊराव कऱ्हाडेंचा टीडीएम ‘या’ दिवशी पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे : प्रसिद्ध दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचा TDM हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. हा सिनेमा २५ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. मात्र सिनेमा चांगला असून देखील या सिनेमाला सिनेमागृहात शो मिळत नसल्याची तक्रार दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी केली होती. यानंतर त्यांनी या चित्रपटाचे प्रदर्शन देखील थांबवले होते. दरम्यान, भाऊराव कऱ्हाडे यांनी टीडीएम सिनेमाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी टीडीएम हा सिनेमा पुन्हा एकदा रिलीज करणार असल्याचं म्हटलं आहे. ९ जूनपासून पुन्हा एकदा टीडीएम सिनेमा प्रदर्शित करणार असल्याचं म्हटलं आहे. आता परत एकदा चित्रपट धमाकेदार कामगिरी करताना नक्कीच दिसणार आहे.

हेही वाचा – ‘मला मुख्यमंत्री करा, अन्यथा…’; काँग्रेस नेत्याने अध्यक्षांकडे मांडली भूमिका

दरम्यान, दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे हे सिनेमाला चित्रपटगृहात शो मिळत नसल्याने रडताना देखील दिसले होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांनी या सिनेमाचे चित्रिकरण तात्काळ थांबवण्याचा मोठा निर्णय घेतला होता. मात्र आता त्यांनी हा सिनेमा पुन्हा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button