Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये शाळा बंद; तरीही साडेतीन कोटीची होतेय शालेय साहित्य खरेदी

काही जून्या ठेकेदारांना पुनप्रत्ययी आदेश, तसेच मध्यवर्ती भांडारकडून निविदा प्रसिध्द

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरात कोरोना संसर्गाचा हाहा:कार सुरु आहे. दररोज शेकडो रुग्ण पाॅझिटिव्ह येत आहेत. या परस्थितीत महापालिकेच्या प्राथमिक शाळा बंद स्थितीत आहेत. तर माध्यमिक शाळा आॅनलाईन सुरु आहेत. कोरोना महामारीत शाळा कधी सुरु होतील, हे निश्चित सांगता येत नाही. तरीही महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून साडेतीन कोटी रुपयाची खरेदीचा घाट घातला आहे. तसेच काही जून्याच ठेकेदारांना पुनप्रत्ययी आदेशान्वये खरेदी करण्यात येवू लागली आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांकडून कोरोना महामारीत संधी साधून ह्या खरेदीचा डाव आखल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी साहित्य खरेदी करण्यात येत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील सर्व शाळा बंद आहेत. तर पिंपरी चिंचवड शहर हे पुन्हा रेडझोन क्षेत्राकडे वाटचाल करीत आहे. या परस्थितीत महापालिका शिक्षण विभागाने खरेदीचा डाव आखला आहे. तसेच काही जून्या ठेकेदारांच्या साहित्यावर खरेदी समितीचे आक्षेप नोंदविले असतानाही देखील पुनप्रत्ययी आदेशान्वये ठेकेदारांना ठेके देण्याचा हट्टाहास अतिरिक्त आयुक्त (1) यांनी केला आहे.

शिक्षण समितीने जून्या ठेकेदारांकडून शालेय वह्या, चित्रकला वही, भुगोल नकाशा वही, विज्ञान वही, अभ्यासपुरक पुस्तके याविषयी पुनप्रत्ययी आदेशान्वये पुर्वीच्याच ठेकेदारांना कामाचे आदेश दिले आहेत. तसेच कोरोना विषाणू संसर्गामुळे सध्यस्थितीत राज्यभरात सर्व प्राथमिक शाळा या बंद आहेत. त्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर रेडझोनमध्ये असल्याने महापालिका हद्दीतील प्राथमिक शाळा सुरु होणे याबाबत शासनाचे कोणतेही मार्गदर्शन नाही.

तरीही महापालिका अतिरिक्त आयुक्त (1) यांच्या निर्देशानूसार शालेय साहित्य खरेदीची कार्यवाही प्रस्तावित करण्यात आलेली आहे. मध्यवर्ती भांडार विभागाने शालेय दप्तर, शालेय बुट व मोजे, शालेय कंपासपेटी व लेखनपॅड असे एकूण 3 कोटी 41 लाख 32 हजार 203 रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देवून निविदा प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button