Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

जिल्ह्यात आता बॅटरी संचलित घंटागाड्या धावणार

अमरावती : जिल्हा परिषद, अमरावती अंतर्गत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून अमरावती जिल्ह्यातील 26 ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनासाठी बॅटरी ऑपरेटेड ई-रिक्षांचे वाटप करण्यात येणार आहे. ग्रामीण स्वच्छता व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी जिल्ह्यात आता बॅटरी संचालित घंटागाड्या धावणार आहेत.

जिल्हा परिषद येथे आयोजित कार्यक्रमात महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या वाहनांना हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार प्रवीण तायडे, प्रताप अडसड, संजय खोडके, राजेश वानखडे, केवलराम काळे, उमेश उर्फ चंदू यावलकर, रवी राणा, महापौर श्रीचंद तेजवानी, विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, महानगर पालिका आयुक्त वर्षा लड्डा उपस्थित होते.

घराघरातून कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण आणि शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेला या वाहनांमुळे गती मिळणार असून ग्रामीण स्वच्छतेसह पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार आहे. पारंपरिक डिझेल वाहनांच्या तुलनेत ही ई-वाहने पर्यावरणपूरक असून इंधन खर्चातही बचत होणार आहे.

हेही वाचा –  मंत्री संजय राठोड यांच्याकडून वडाळी तलाव परिसराची पाहणी

घनकचरा संकलन व व्यवस्थापन अधिक प्रभावी, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने राबविण्यासाठी पंचायत विभागाच्या प्रशासकीय मान्यतेने ही वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. प्रत्येकी ३ लाख रुपये किंमतीच्या या वाहनांसाठी एकूण 78 लाख रुपयांचा निधी 15 व्या वित्त आयोगातून उपलब्ध करून देण्यात आला आहे.

ही वाहने लवकरच संबंधित ग्रामपंचायतींच्या स्वाधीन करण्यात येणार असून त्याद्वारे स्वच्छ भारत मिशन अभियानाला नवी गती मिळणार आहे.

अमरावती तालुक्यातील ब्राम्हणवाडा गोविंदपूर व लोणटेक, अचलपूर तालुक्यातील वडगाव फत्तेपूर व रासेगाव, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील टाकरखेडा मोरे व खानमपूर पांढरी, भातकुली तालुक्यातील आसरा व टाकरखेडा शंभू, चांदूर बाजार तालुक्यातील कुर्हा, चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला व कवठा कडू, दर्यापूर तालुक्यातील पिंपलोद व थिलोरी, मोर्शी तालुक्यातील शिरखेड व खानापूर, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाढोणा रामनाथ व धानोरा गुरव, तिवसा तालुक्यातील शिरजगाव मो, वरुड तालुक्यातील हातुर्णा व शहापूर, धारणी तालुक्यातील हरिसाल व कुसुमकोट बु., धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंगी व वडगाव राजदी तसेच चिखलदरा तालुक्यातील टेंभूसोडा व काटकुंभ या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button