‘एकनाथ शिंदेंबरोबर गेलेले १२ आमदार उद्धव ठाकरेंकडे परतणार’; असीम सरोंदेंचा मोठा दावा
![Asim Sarode said that 12 MLAs who went with Eknath Shinde will return to Uddhav Thackeray](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Eknath-Shinde-4-780x470.jpg)
मुंबई | शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये उभी फूट पडली आहे. अशात आता ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी १२ आमदारांची यादीच वाचत हे सगळेजण उद्धव ठाकरेंकडे परतणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
एका सभेत बोलताना असीम सरोदे म्हणाले की, श्रीनिवास वनगा, लता सोनवणे, महेंद्र दळवी, प्रकाश सुर्वे, बालाजी कल्याणकर, चिमणराव पाटील, नितीनकुमार तळे, प्रदीप जैसवाल, उदयसिंह राजपूत, महेश शिंदे, प्रकाश आबिटकर हे १२ आमदार उद्धव ठाकरेंकडे परतणार आहेत. हे बारा आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात परतण्यास तयार आहेत.
हेही वाचा – मविआतून कराळे गुरुजी वर्धा लोकसभेसाठी इच्छुक, शरद पवार यांच्याशी केली चर्चा
कारण त्यांच्या लक्षात आलं आहे की यांच्यासह (एकनाथ शिंदे) आपलं भविष्य नाही ज्यांना ठाणे जिल्ह्याच्या बाहेर ओळख नाही, असा टोलाही असीम सरोदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला आहे. इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचेही अनेक नेते शरद पवारांकडे परत येतील अशा चर्चा सुरु आहेत, असंही सरोदे यांनी म्हटलं आहे.