breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मविआतून कराळे गुरुजी वर्धा लोकसभेसाठी इच्छुक, शरद पवार यांच्याशी केली चर्चा

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणा आज दुपारी तीन वाजता केली जाणार आहे. राज्यामध्ये अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीचा उमेदवारीवरून काथ्याकूट सुरु असला, तरी इच्छुकांची मात्र घालमेल वाढत चालली आहे. सोशल मीडियमध्ये प्रचंड प्रसिद्ध असलेले नितेश कराळे गुरूजी महाविकास आघाडीकडून वर्धा लोकसभेतून इच्छुक आहेत.

नितेश कराळे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. ते स्वत: वर्धा लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छूक आहेत. मी मागील तीन निवडणुकींबाबत शरद पवारांशी चर्चा केली. पक्षश्रेष्ठी काय करायचं आहे ते ठरवतील. मी माझी भांडली असून शेतकऱ्यांचे मुद्दे घेऊन मी पुढे जात असल्याचं कराळे गुरूजी म्हणाले.

हेही वाचा    –    ‘पैशांचा वापर करून शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष फोडले’; राहुल गांधींचा आरोप 

मी विधान परिषदेची निवडणूक लढवली आहे. वर्ध्यातील स्थानिक राजकारणावर बोलताना त्यांनी सांगितले की, वर्धामधून गेल्या दहा वर्षापासून भाजपचे खासदार रामदास तडस असून त्यांनी जसं हवं तसं काम केलेलं नाही. शेतकऱ्यांच्या मालाचा विषय आहे, भाव वाढीचा विषय आहे, निर्यात बंदी केल्याने अवघड झालं आहे. शेतकऱ्यांची बाजू केंद्रात मांडली गेली नाही, असं कराळे गुरूजी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button