breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

काँग्रेसमधून राजीनामा का दिला? भाजपात जाणार का? अशोक चव्हाण म्हणाले..

मुंबई | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभा सदस्य आणि काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांना भाजपाकडून राज्यसभेवर पाठवले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, यावरून स्वत: अशोक चव्हाण यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

अशोक चव्हाण म्हणाले की, मी विधानसभा अध्यक्षांना भेटून काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तर प्रदेशाध्यक्षांना काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मी काँग्रेसमध्ये असताना नेहमीच प्रामाणिकपणे काम केलं. मला कोणाबद्दल कसलीही तक्रार करायची नाही, राजीनामा देण्यामागे कुठलीही व्यक्तीगत भावना नाही. माझी पुढची राजकीय दिशा काय असेल याबाबत निवेदन निश्चित करेन. एक ते दोन दिवसांत तुम्हाला सर्वकाही सांगेन.

हेही वाचा     –      CRPFची परीक्षा आता होणार मराठीत! गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय

भाजपात जाणार का? भाजपा तुम्हाला राज्यसभेवर पाठवणार का? असा सवाल विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, मला भाजपाची कार्यप्रणाली माहिती नाही. भाजपात जाण्याचा मी अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. मी मघाशी सांगितल्याप्रमाणे येत्या दोन दिवसांत माझी भूमिका स्पष्ट करेन.

प्रत्येक गोष्टीला काही कारण असलंच पाहिजे असं नाही. मी जन्मापासून काँग्रेसचं काम केलं आहे, आता मला वाटलं अन्य पर्याय पाहिले पाहिजेत म्हणून राजीनामा दिला आहे. मला कोणतीही पक्षांतर्गत गोष्ट जाहीर करायची नाही, किवा उणीदुनी सांगायची नाहीत. कोणत्याही काँग्रेसच्या आमदाराशी माझं काही बोलणं झालेलं नाही. काँग्रेस सोडणं हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. मी मंत्री असताना भाजपासहित सर्व पक्षांच्या आमदारांना निधी दिला आहे. मी कधीही भेदभाव केला नाही, असंही अशोक चव्हाण म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button