Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

चंद्रकांत पाटलांनी घेतली राज्यपालांची अचानक भेट; राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची अचानक भेट घेतली. त्यांनी घेतलेल्या भेटीमुळे अनेक राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ही भेट नेमकी कोणत्या विषयावर होती? याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही.

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या यादीचा प्रस्ताव दिल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची अचानक भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चाना अजूनच जोर धरला आहे.

तसेच मागील दोन दिवसांपासून रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना केलेल्या अटके प्रकरणात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांच्याकडून करण्यात आली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे सोमवारपासून राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिकाच्या आणि इतर नुकसानी संदर्भातील मदत देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. मात्र, अद्यापही या मदती संदर्भात प्रशासकीय पातळीवर प्रचंड मोठा गोंधळ आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button