अशोक चव्हाणांकडून काँग्रेस सदस्यत्वपदाचा राजीनामा, भाजपात प्रवेश करणार?
![Ashok Chavan resigns from Congress membership](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Ashok-Chavan-780x470.jpg)
मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपात पक्ष प्रवेश केला आहे. यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याची मोठी माहिती समोर येत आहे. त्यामुळे कॉंग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
अशोक चव्हाण यांनी आज सकाळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. त्यानंतर अशोक चव्हाण नॉटरिचेबल झाले. भाजपचे बडे नेते भाजपच्या मुंबईतील कार्यलयात दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा हे नेते भाजपच्या कार्यालयात दाखल झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.
हेही वाचा – मनोज जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली, उपोषणाचा तिसरा दिवस
अशोक चव्हाण यांचा काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा ही राजीनामा! pic.twitter.com/99ZpiWHpmr
— yogesh sawant (@yogi_9696) February 12, 2024
अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, भाजपसोबत अनेक मोठ्या पक्षांचे नेते येऊ इच्छितात. काँग्रेसचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या वागणुकीमुळे या नेत्यांची पक्षात घुसमट होत आहे. या नेत्यांना देशातील मुख्य प्रवाहात काम करायचे आहे. पण काँग्रेस नेतृत्त्वाच्या भूमिकेमुळे ते शक्य होत नाही. पण अनेक मोठ्या राजकीय पक्षांचे नेते मोदींच्या नेतृत्वाखाली मुख्य प्रवाहात काम करु इच्छितात. आमच्या संपर्कात कोण, याचा खुलासा लवकरच होईल, असं ते म्हणाले.