अशोक चव्हाण काँग्रेसवर दावा करणार का? संजय राऊतांचा खोचक टोला

मुंबई | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे प्राथमिक सदस्यत्व सोडत असल्याचं जाहीर केलं. तसेच आमदारकीचाही राजीनामा दिल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अशोक चव्हाण यांना खोचक टोला लगावला आहे. अशोक चव्हाण काँग्रेसवर दावा करणार का? असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊतांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. अशोक चव्हाण भाजपवासी झाले.विश्वास बसत नाही. काल पर्यंत ते सोबत होते.. चर्चा करीत होते..आज गेले. एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्या प्रमाणे चव्हाण सुध्दा आता काँग्रेस वर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय? आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय? आपल्या देशात काहीही घडू शकते! असा टोला त्यांनी लगावला आहे.
हेही वाचा – अशोक चव्हाणांकडून काँग्रेस सदस्यत्वपदाचा राजीनामा, भाजपात प्रवेश करणार?
अशोक चव्हाण भाजपवासी झाले.विश्वास बसत नाही. काल पर्यंत ते सोबत होते.. चर्चा करीत होते..आज गेले.
एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्या प्रमाणे चव्हाण सुध्दा आता काँग्रेस वर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय?
आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय?
आपल्या देशात काहीही घडू शकते!… pic.twitter.com/tjX1XzL3Ns— Sanjay Raut (@rautsanjay61) February 12, 2024
दरम्यान, अशोक चव्हाण यांनी स्वतः समाजमाध्यमांद्वारे सर्व घडामोडींची माहिती दिली. चव्हाण यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. आज सोमवार, १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.





