व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रोड्रिग्ज व त्यांच्या शिष्टमंडळाचे आगमन व प्रयाण

मुंबई : व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रोड्रिग्सज व त्यांचे शिष्टमंडळाचे छत्रपती संभाजीनगर येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आज सायं ४.०० वाजता आगमन झाले.
यावेळी मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, सामान्य प्रशासन (राजशिष्टाचार) विभागाच्या उपसचिव क्रांती पाटील, व्हेनेझुएलाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हेही वाचा – सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रोड्रिग्सज व त्यांच्या शिष्टमंडळाचे आज सायं ५.४० वाजता प्रयाण केले.
यावेळी मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, सामान्य प्रशासन (राजशिष्टाचार ) विभागाच्या उप सचिव क्रांती पाटील, व्हेनेझुएलाचे प्रतिनिधी उपस्थित होते.





