Breaking-newsपुणेमहाराष्ट्र

शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद

पर्वती जलकेंद्र, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव, लष्कर, एसएनडीटी-वारजे आणि नवीन होळकर पंपिंग स्टेशन येथे गुरुवारी (२१ फेब्रुवारी) विद्युत आणि स्थापत्यविषयक दुरुस्तीची अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (२२ फेब्रुवारी) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळवण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारे भाग पुढीलप्रमाणे आहेत.

पर्वती जलकेंद्र- शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी रस्ता परिसर, स्वारगेट, पर्वती, मुकुंदनगर, पर्वती गाव, सहकारनगर, सातारा रस्ता, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रस्ता ते एसएनडीटी परिसर, एरंडवणा, कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, विधी महाविद्यालय रस्ता, पद्मावती

वडगाव जलकेंद्र- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक

चतु:शृंगी- एसएनडीटी, वारजे, पाषाण, पुणे विद्यापीठ परिसर, वारजे माळवाडी, पॉप्युलरनगर, औंध-बावधन, सूस, सुतारवाडी आणि भूगाव रस्ता

लष्कर जलकेंद्र आणि नवीन होळकर पंपिंग केंद्र- लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, कोरेगाव पार्क, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, मुंढवा, येरवडा, विश्रांतवाडी, कल्याणीनगर, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर आणि नगर रस्ता.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button