Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

अमित ठाकरेंचा ताफा अडवला, समृद्धी वरील टोलनाक्याची मनसैनिकांकडून तोडफोड

मुंबई : मनसे युवा नेते अमित ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा अडवल्याच्या कारणामुळे संतप्त मनसैनिकांनी टोलनाक्याची तोडफोड केली आहे. समृद्धी महामार्गावरील सिन्नर तालुक्यातील टोल नाक्याची काल रात्री मनसैनिकांनी तोडफोड केली आहे. अमित ठाकरे हे शिर्डीहून नाशिककडे परतत होते.

अमित ठाकरे हे नाशिक दैऱ्यावर आहेत. शनिवारी ते अहमदनगर, शिर्डी येथे गेले होते. समृद्धी महामार्गावरून ते नाशिककडे परतत असताना सायंकाळी साडेसात वाजता सिन्नर तालुक्यातील टोल नाक्यावर त्यांचे वाहन कर्माचाऱ्यांनी अडवले. सुमारे अर्धातास त्यांचे वाहन कर्माचाऱ्यांनी रोखून ठेवले. या कारणावरून मनसैनिकांनी टोलनाक्याची तोडफोड केली आहे.

हेही वाचा – अर्थमंत्रीपदाची सुत्रे स्वीकारताच अजितदादांचा ‘राष्ट्रवादी’च्या आमदारांवर निधीवर्षाव

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, शहर उपाध्यक्ष अक्षय खांडरे व कार्यकर्त्यांनी रात्री सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील तो टोलनाका गाठला. लाठा-काठ्यांनी तोडफोड करीत घोषणाबाजी केली. टोलनाक्याच्या केबिनच्या काचा फोडल्या. तसेच यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, अशा घोषणाही देण्यात आल्या.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button