आगामी निवडणुकीनंतर सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजित पवार म्हणाले..

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार महायुतीसोबत तर शरद पवार महाविकास आघाडीसोबत आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील का? असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं भाष्य केलं आहे. तसेच, सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतही भाष्य केलं आहे.
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना अजित पवारांसाठी परतीचे दार बंद झाले आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर शरद पवार म्हणाले होते की, यासंदर्भातील निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातील नेते एकत्र मिळून घेतील. आता अजित पवारांना हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी नो कमेंट्स इतकंच उत्तर दिलं आहे.
हेही वाचा – महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यांच्या कामाबाबत खासदार श्रीरंग बारणे आक्रमक!
आगामी निवडणुकीनंतर सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होईल? असा प्रश्न विचारला असता. अजित पवार म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे. आम्ही सर्व आमदार एकत्र बसून ठरवणार आहोत. फक्त महायुतीचा मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महायुतीच्या आधिकाधिक जागा निवडून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं ते म्हणाले.





