TOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

देशभरातील सर्व सुरक्षा दलातील अधिकारी आणि जवानांसाठी विविध पदकांची घोषणा

पिंपरी: पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील सर्व सुरक्षा दलातील अधिकारी आणि जवानांसाठी विविध पदकांची घोषणा करण्यात आली आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशातील संरक्षण क्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विविध पदके जाहीर केली जातात. त्यासाठी निवड प्रक्रिया वर्षभर सुरू असते. ही पदके गुणवत्तापूर्ण सेवा, विशेष कामगिरीसाठी दिली जातात.केंद्रीय राखीव पोलीस दलातील एकाला शौर्यसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. देशातील 229 जणांना शौर्यसाठी पोलीस पदक देण्यात आले, त्यात महाराष्ट्रातील 33 जणांचा समावेश आहे. तर 642 जणांना गुणवंत सेवेसाठी पोलीस पदक प्रदान करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 40 जणांचा समावेश आहे.

देशभरातील 82 जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातून फक्त तीन अधिकारी आहेत. अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button