breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत’; काँग्रेस नेत्याचं मोठं विधान

मुंबई : शिंदे गटातील आमदार अपात्रेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष लवकरच घेतील. त्यानंतर अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, अशी सर्वत्र चर्चा आहे. दरम्यान, यावरून काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत, असं वक्तव्य हुसेन दलवाई यांनी केलं आहे.

हुसेन दलवाई म्हणाले की, निकाल लागेल असं तुम्हाला वाटतं का? माझ्या मते निकाल लागणारच नाही. आणखी काही दिवस असेच ढकलले जातील. काहीही निकाल लागला तरी सरकारवर काहीही परिणाम होईल, असं मला वाटत नाही. ते निकाल अशाप्रकारे लावतील की, कुणाचंही सदस्यत्व रद्द होणार नाही. हे सरकार ढकलून-ढकलून चालवलं जाईल ते अजित पवारांना कसं काय मुख्यमंत्री करतील? अजित पवारांना ते मुख्यमंत्री करतील, असं मला मला मुळीच वाटत नाही.

हेही वाचा – Pune : १५ ऑगस्टला जिल्ह्यातील गडकिल्ल्यांवर फडकणार तिरंगा

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक अजित पवार की शरद पवार कोणाकडे जातील? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ते मी सांगू शकत नाही. नवाब मलिक बाहेर आले, ही चांगली गोष्ट आहे. त्यांना इतके दिवस तुरुंगात का ठेवलं होतं? हेच मला कळत नाही आणि आता बाहेर येण्यासाठी नेमकी काय जादू झाली? हेही समजत नाही, असंही ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button