breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

गायीचं डोहाळे जेवण; गावांसह नातेवाईकांना पत्रिका छापून निमंत्रण

सोलापूर –  सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णीसह आढेगावात परिसरात एकच चर्चा आहे, ही चर्चा एका गायीच्या डोहाळे जेवणामूळे चांगलीच रंगली आहे. एका शेतकऱ्याने आपल्या गाईच्या डोहाळ जेवणाचा आनंद हा गाव जेवण देऊन साजरा केला. याकरिता त्यांनी चक्क पत्रिका वाटून गावकऱ्यांसह पाहुण्यांनाही आमंत्रित केलं होतं.

आढेगावमधील 30 लोकांचे एकत्र कुटुंब असलेले शेतकरी अंगत निकम आणि त्यांची पत्नी लक्ष्मी निकम यांनी संपूर्ण गावासाठी आपल्या कुटुंबाच्या लाडक्या असलेल्या कमला गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला. यासाठी त्यांनी 500 पत्रिका छापून लोकाना आमंत्रित केलं. डोहाळे जेवण म्हटलं की, मग नटनं आलंच. या गायीला हिरवी साडी, फुलांच्या माळा, हळदी कुंकू लावून सोन्याचे मंगळसुत्र  घालून छान नटवण्यात आलं.

अंगद निकम यांची आढेगाव गावाजवळ तीन एकर शेती आहे. पण जेव्हा गीर जातीची गौरी नावाची गाय घेतली त्या दिवसापासून निकम यांची शेतीत प्रगती होऊ लागली. गौरी गायीच्या शेण आणि गोमुत्राचं पाणी करून ते आपल्या पिकाला देऊ लागले. ऊसाचे उत्पादन पहिल्यापेक्षा दुपटीने निघू लागले. मिरच्या, टोमॅटो  पिकांच्या उत्पादनात यामुळे चांगली वाढ झाल्याचं ते सांगतात. गायीच्या दूधातूनही आर्थिक बाजूही सावरली. गरीब असणाऱ्या निकम कुटुंबाची अवघ्या काही वर्षातच भरभराट झाली. याचं सगळं श्रेय ते आपल्या कमला गायीला देतात.

स्वतःच्या मुलांप्रमाणेच निकम दाम्पत्य जिव्हाळ्याने पशुधनाचा सांभाळ करतात.  निकम दाम्पत्यासही दोन मुली आहेत. गौरी गायही आपल्या मुलीसारखीच आहे, असं सांगत आढेगावच्या निकम दाम्पत्याने मायेपोटी चक्क गौरी गायीचे डोहाळे पुरवले आणि धुमधडाक्यात गावजेवण दिलं. आजवर गरोदर स्त्रियांसाठी डोहाळे जेवण घातलेलं आपण पाहिलं आहे. पण हा कृतज्ञता सोहळा वेगळाच होता.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button