breaking-newsराष्ट्रिय

फेसबुक खाते हॅक करून भाजपने आमच्या कुटुंबात भांडणे लावली – तेजप्रताप

पाटणा – भारतीय जनता पक्षाने माझे फेसबुक अकौंट हॅक करून आमच्या कुटुंबात भांडणे लावण्याचा उद्योग केला आहे असा आरोप लालूप्रसाद यादव यांचे पुत्र व माजी मंत्री तेजप्रताप यादव यांनी केला आहे.

आजच त्यांच्या फेसबुकवर एक संदेश पोस्ट झाला आहे त्यात तेजप्रताप यादव यांनी म्हटले आहे की आपल्या पक्षातील काहीं नेत्यांच्या कृत्यामुळे आपण अस्वस्थ आहोत. राजदचे नेते लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी यांनीही आपल्या तक्रारीकडे लक्ष दिलेले नाहीं अशी तक्रार त्यांनी या पोस्टमध्ये केल्याच दिसून आले आहे. तथापी ही पोस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर तासाभराने त्यांनीच स्वतच या पोस्टचा इन्कार केला आहे. ही पोस्ट आपली नाहीं.

आपले फेसबुक खाते हॅक करून त्यांत भाजप समर्थकांनीच हा मजकूर भरला आहे असे त्यांनी म्हटले आहे. आमच्या घरात भांडणे लावण्यासाठीच त्यांनी हे प्रयत्न चालवले आहेत. त्यांनी यापुर्वीही माझी सोशल मिडीयातील खाती हॅक करण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना आज यश आले. केवळ माझेच नव्हे तर आपल्या वडिलांचेही फेसबुक खाते संघाच्या समर्थकांनी हॅक केले होते असेही त्यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button