breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

नीरव मोदींची ४०० कोटींची मालमत्ता ताब्यात घेण्यास पीएनबीला अनुमती

मुंबई – पंजाब नॅशनल बँकेचा सुमारे साडे तेरा हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून परदेशात पळून गेलेला फरार आरोपी आणि हिरे व्यापारी नीरव मोदीच्या सुमारे चारशे कोटी रुपयांच्या मालमत्तेचा ताबा घेण्याची परवानगी विशेष पीएमएलए न्यायालयाने पीएनबी बॅंकेला दिली आहे.

निरव मोदीच्या फायरस्टार डायमंड इंटरनॅशनल प्रा लि आणि फायरस्टार इंटरनॅशनल लिमिटेड या मालमत्तेचा ताबा पंजाब नॅशनल बँकेला मिळाला आहे. यापैकी एफआयएलच्या १०८.३ कोटी रुपयांची मालमत्ता तर अन्य कंपनीच्या सुमारे ३३१.६ कोटी रुपयांच्या मालमत्तेचा त्यात समावेश आहे. पीएमएलए न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत गुरुवारी उपलब्ध झाली आहे. ऋण वसुली आयोगाने बँकेच्या अंदाजित नुकसानीबाबत निर्देश दिले आहेत. एफआयएलने बँकेला सुमारे १२६४ कोटींचे देणे आहे आणि यावर सन २०१८ पासूनचे व्याजही आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

ईडीने नीरवच्या अनेक मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. मोदीला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केल्यानंतर ही कारवाई करण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. मात्र यापैकी अनेक मालमत्ता दुसऱ्या कुणीतरी दावा करुन ताब्यात घेतल्या आहेत. तसेच बँकेने आणि त्यांच्या कन्सोर्टियनने देखील काही मालमत्ता गहाण म्हणून घेतल्या होत्या. सामंजस्य करार करून बँकेने या मालमत्ता ताब्यात घेतल्या होत्या. मात्र ईडीने या मालमत्ता जप्त केल्यावर त्या परत मिळाव्यात म्हणून बँकेने न्यायालयात अर्ज केला होता. ईडीने मालमत्ता परत देण्यासाठी न्यायालयात तयारी दर्शविली.पण न्यायालयाने आदेश दिले तर ती मालमत्ता पुन्हा देण्याची हमी ईडीने मागितली होती. न्यायालयाने याची नोंद घेतली आणि संबंधित मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी बँकेला परवानगी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button