breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉक्टर, परिचारिकांना क्वारन्टाइन होण्याची वेळ

करोना संशयित असूनही केवळ पक्षाघाताचा रुग्ण असल्याचे सांगत उपचारास आलेल्या रुग्णामुळे नवेच संकट उभे ठाकले आहे. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य यंत्रणेत मोठी खळबळ उडाली. त्या रुग्णावर उपचार करणारे, त्याच्या संपर्कात आलेले नऊ डॉक्टर व आठ परिचारिकांना आता ‘क्वारन्टाइन’ करण्यात आले आहे. त्यामुळे आधीच अपुऱ्या मनुष्यबळाचा सामना करणाऱ्या आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढणार, हे स्पष्ट झाले आहे.

जरीपटक्यातील व्यक्ती खामला परिसरातील करोनाबाधिताच्या संपर्कात आली. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तिच्या माध्यमातून तिच्या भावालाही करोनाची बाधा झाली. हा भाऊ गेल्या काही महिन्यांपासून पक्षाघातामुळे अंथरुणाला खिळला होता. शनिवारी तो मेडिकलच्या कॅज्युअल्टीत दाखल झाला. तेव्हा त्याने आपल्या करोनाबाधित भावाच्या संपर्कात आल्याची बाब लपवून ठेवली. तसेच आपल्याला केवळ मेंदूआघात झाल्याचे सांगितले होते. तोवर कॅज्युअल्टीमधील सात डॉक्टर आणि चार परिचारिका या रुग्णासोबत एक मीटरहून कमी अंतराच्या आत संपर्कात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button