breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारणराष्ट्रिय

“हे अमानवीय कृत्य, माझ्याकडे शब्द नाहीत”; बलात्कार पीडितेच्या ‘त्या’ व्हिडिओवरुन उर्मिला मातोंडकर संतापल्या

मुंबई |

मध्य प्रदेशमध्ये एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीसोबतच दोरीने बांधून धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे पीडितेच्या नातलगांनी, कुटुंबीयांनीच तिला आरोपीसोबत चालायला भाग पाडलं, इतकंच नाही तर दोघांची धिंड काढताना हा जमाव ‘भारत माता की जय’च्या घोषणाही देत होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी चांगलाच संताप व्यक्त केलाय. “या घटनेबाबत बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयेत. मध्य प्रदेशमध्ये १६ वर्षांच्या बलात्कार पीडितेला तिच्यावर बलात्कार करणाऱ्यासोबतच दोरीने बांधून जाहीर मिरवणूक काढण्यात आली. हा सर्व अत्याचार सुरु असताना ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या जात होत्या? आपण (समाज म्हणून) इथपर्यंत कसे आलो? हे कृत्य अमानवीय आहे”, अशा आशयाचं ट्विट करत उर्मिला यांनी आपला राग व्यक्त केला.

दरम्यान, या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. रविवारी हा प्रकार घडल्याचं समजतंय. व्हायरल व्हिडिओमध्ये पीडिता आणि आरोपीला एका दोरीने बांधून त्यांची धिंड काढताना दिसत आहे. त्यांच्या चहुबाजूला काही लोकं असून ते ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत आहेत. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी पीडितेची जमावापासून सूटका केली. या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिस अधिकारी दिलीपसिंह बिल्वाल यांनी दिली. “या प्रकरणी बलात्कार करणाऱ्या आरोपीला आणि धिंड काढणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. पहिला गुन्हा बलात्काराचा आरोप असलेल्या २१ वर्षीय व्यक्तीविरोधात, तर दुसरा गुन्हा पीडितेच्या नातेवाईकांविरोधात आणि गावकऱ्यांविरोधात दाखल करण्यात आला आहे. पीडितेला आणि आरोपीला मारहाण करुन त्यांची धिंड काढल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे”, अशी माहिती दिलीपसिंह बिल्वाल यांनी दिली. भारतीय दंड संहिता (आयपीसी) अंतर्गत आणि लैंगिक अपराधांपासून लहान मुलांच्या संरक्षण कायद्यातील तरतुदींखाली(पॉस्को) गुन्हा दाखल करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, या धक्कादायक घटनेमुळे मध्य प्रदेशमधील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

वाचा- धक्कादायक!! ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत बलात्काऱ्यासोबतच दोरीने बांधून काढली पीडितेची धिंड

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button