ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोनामुळे मृत्यु झालेल्या नागरिकांच्या कुटुंबाला मालमत्ता हस्तांतरण शुल्क माफ – महापौर ढोरे

पिंपरी चिंचवड | कोरोना महामारीच्या काळात रुग्णांची संख्या वाढत असताना सर्वसामान्य रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांच्या परिस्थितीवर परिणाम होत असते. ब-याचदा त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली जाते. अशावेळी त्या कुटुंबाला दिलासा देण्यासाठी महापालिकेने पाऊले उचलली आहेत. सदरची परिस्थीती लक्षात घेता पिंपरी – चिंचवड शहरातील कोरोनामुळे मृत्यु झालेल्या नागरिकांच्या कुटुंबाला मालमत्ता हस्तांतरण शुल्क माफ करण्यात आला आहे अशी माहिती महापौर उषा ढोरे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना महापौर ढोरे म्हणाल्या कोरोनामुळे कुटुंबातील कुटुंब प्रमुखाचे निधन झाल्यामुळे त्या व्यक्तीच्या कुटुंबावर सर्वच बाजूंनी दु:खाचे डोंगर कोसळतो. पर्यायाने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात आर्थिक ताण येतो. हा आर्थिक ताण कमी व्हावा म्हणून कोरोनाने मृत्यु पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना मालमत्ता हस्तांतरण शुल्क माफ करण्यात आल्याचे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सांगितले.

तसेच मिळकतकर धारकांना कर भरण्यास प्रोत्साहन देणेकामी थकबाकीच्या दंड रक्कमेवर सवलत देण्यासाठी महापालिकेच्या वतीने “मिळकतकर अभय योजना” राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये दिनांक 22 जानेवारी 2022 ते 31 जानेवारी 2022 अखेर जे मिळकतधारक थकबाकीसह संपूर्ण मिळकतकराचे एकरक्कमी भरणा करतील त्यांना आकारण्यात आलेल्या मनपा विलंब दंड 90 टक्के सवलत देय राहील.

दिनांक 01 फेब्रुवारी 2022 ते 28 फेब्रुवारी 2022 अखेर जे मिळकतधारक थकबाकी सह संपुर्ण मिळकतकराचा एकरक्कमी भरणा करतील त्यांना आकारण्यात आलेल्या मनपा विलंब दंड रकमेचे 80 टक्के सवलत देय राहील. तसेच दिनांक 1 मार्च 2022 ते 31 मार्च 2022 अखेर जे मिळकतधारक थकबाकीसह संपुर्ण मिळकतकराचा एकरकमी भरणा करतील त्यांना आकारणेत आलेल्या मनपा विलंब दंड रकमेचे 70 टक्के सवलत देय राहील. सदर सवलत अवैध बांधकाम शास्तीकराकरिता लागू नाही असेही महापौर माई ढोरे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button