breaking-newsपिंपरी / चिंचवड

वडगाव मावळमध्ये संजोग वाघेरे पाटील यांच्या उपस्थितीत नियोजन आढावा बैठक

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सहभाग

वडगाव : मावळ तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरद पवार गट ) यांच्या सर्व पदाधिकारी, समन्वयक आणि कार्यकर्ते यांची मावळ लोकसभा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या उपस्थितीत प्रचार नियोजन आढावा बैठक वडगाव येथील द्वारकाधीश मंगल कार्यालय येथे नुकतीच संपन्न झाली.

जिल्हाप्रमुख शिरीष घरत, तालुकाप्रमुख संदीप तांडेल, न्यू पनवेलचे शहर प्रमुख नितीन देशमुख शहर संघटिका अपूर्वा प्रभू, राष्ट्रवादी व्यापारी संघ जिल्हाध्यक्ष सनी जामदार, आकाश चतुर्वेदी, मंगेश रोकडे, हरिश्चंद्र निंबळेकर, उत्तम भोईर, सचिन मते यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

हेही वाचा – विवाह मंडपातच वधू-वराकडून मतदानाची शपथ

मावळ लोकसभा मतदार संघातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर मतदार संघातील प्रचाराचे नियोजन करून कोपरा सभा, गावभेट दौरा, मेळाव्यांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मावळ लोकसभेत प्रचार दौऱ्याचे नियोजन जोमात अशी चर्चा होवू लागली आहे. उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना लोकसभेत पाठ्वाण्य्साठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले आहेत.

दरम्यान, प्रचार नियोजन आढावा बैठकी नंतर उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी लोणावळा येथील अस्लमभाई यांच्या निवास्थानी सदिच्छा भेट घेतली. पंचवटी सोसायटी, उसराळी ग्रामपंचायत ग्रुप, पनवेल गाव या ठिकाणी कार्यकर्त्याशी संवाद साधला. तसेच तळोजा येथील आयेशा मजीद मध्ये इफ्तार पार्टीत सहभाग घेतला. अफरोज अब्दुल, बशीर शेख, सुलतान मालदार, रमझान शेख यांची भेट घेतली. नवीन पनवेलच्या सेक्टर 16 येथील कर्नाटक हॉल मध्ये कार्यकर्त्यांसोबत चर्चा झाली.

मावळ लोकसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या जागेवर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी करणा-यांना घरी बसविण्यासाठी ही निवडणूक आहे. मावळमधून फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिलेदार संजोग वाघेरे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button