breaking-news

CoronaVirus: मॉरीशसला गेलेल्या पंढरपूरकराला कोरोनाची लागण ?

पंढरपूर | महाईन्यूज

पंढरपुरातून एकजण विदेशात फिरायला गेला होता. तो माघारी येताना त्याच्यामध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे दिसल्याची माहिती मिळत आहे. यामुळे ‘कोरोना व्हायरस’ने पंढरपूरकरालाही सोडले नसल्याचे स्पष्ट होत आहे.सदर रुग्ण मॉरिशसला फिरण्यासाठी गेला होता. तो सध्या आंध्रप्रदेशवरून पंढरपूरला येत आहे.

त्याला वायरस लागण झाली आहे का ? याची तपासणी करण्याच्या अनुषंगाने आरोग्य विभाग कामाला लागला आहे. पंढरपूरमध्ये येताच त्याची प्राथमिक तपासणी करून सोलापूरला पुढील उपचारासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांकडून मिळालेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button