breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

राज्यात गुलाबी थंडीचे आगमन, महाबळेश्वरात सर्वात कमी तापमान

मुंबई – मुंबई शहर आणि उपनगरात ऑक्टोबर हिट जाणवत असली तरी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गुलाबी थंडीचे आगमन झाल्याचेही जाणवत आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये राज्यातील सर्वात कमी तापमान नोंदले गेले आहे. याठिकाणचे तापमान १४.८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे.

पुणे आणि परिसरातील तापमानही १६ अंशाच्या खाली आले आहे. पुण्यातील शिवाजीनगर, पाषाण, राजगुरूनगर, तळेगाव आणि आसपासचे तापमान १६ अंशापर्यंत नोंदले आहे. याशिवाय मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील तापमानाचा पारा १६ ते १८ अंशांपर्यंत घसरला आहे. दिवसा उन्हाचा तडाखा बसत असला तरी सायंकाळ झाली की हवेत गारवा जाणवत आहे. हा गारवा आणखी वाढत जाण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील तापमान मुंबई – २४.५, पुणे – १७, जळगाव – १७.६, नाशिक – १६.१, सातारा – १८.५, सोलापूर – १७.४, नागपूर – १७.७, नांदेड – १८ आणि औरंगाबाद – १६.२ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button